कोल्हापूर - महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी (श.प.) बाहेर पडणाच्या तयारीत
कोल्हापूर, 25 डिसेंबर, (हिं.स.)। कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सवता सुभा मांडला आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील


कोल्हापूर, 25 डिसेंबर, (हिं.स.)। कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सवता सुभा मांडला आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी श. प. पक्षाला विश्वासात न घेणे. जागा वाटपात परस्पर निर्णय घेणे. जाणीवपूर्वक डावलणे असे प्रकार केल्याने आमचा पक्ष स्वतंत्र किंवा इतर पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करून निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचा निर्णय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्हि. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी श. प. पक्षाला महाविकास आघाडीत सन्मानाची वागणूक देऊन योग्य पद्धतीने जागा वाटप करावे यासाठी आज गुरुवार पर्यंतचीच मुदत

देऊन उद्या आमचा पक्ष स्वतंत्रपणे पुढे जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष व्हि. बी. पाटील यांनी जाहीर केले आहे.

याबाबत त्यांनी आ. सतेज पाटील यांचेवर थेट आरोप करून त्यांच्या भुमिकेमुळेच हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, जागा वाटपाबाबत आ. सतेज पाटील यांचेशी ४ वेळा बैठका झाल्या. तरीही त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. पक्षाचे राज्य पातळी वरील जेष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी त्यांचेशी फोनवर चर्चा केली. तरीही आ. सतेज पाटील यांनी आपली भुमिका बदलली नाही. माजी महापौर आणि पक्षाचे नेते असलेल्या आर. के. पोवार यांनाही त्यांनी त्यांच्या प्रभागातील उमेदवारीबाबत साधी चर्चाही केली नाही. काँग्रेस-शिवसेना जागा वाटप बाबत झालेल्या पत्रकार परिषदेला घटक पक्ष म्हणून बरोबर घेतले नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगीतले. यावेळी आमची नाराजी स्पष्ट आहे. महायुती सोडून इतर पक्षाचे कोणी आमच्या बरोबर येत असतील तर तिसऱ्या आघाडीचाही आम्ही विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आर. के. पोवार, रोहीत पाटील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande