बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची मॉब लिंचींग
ढाका, 25 डिसेंबर (हिं.स.) । बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात हिंसक मुस्लीम जमावाने आणखी एका हिंदू युवकाची सामूहिकमारहाण करून (मॉब लिंचींग) हत्या करण्यात आली. मृतक तरुणाचे नाव अमृत मंडल असून त्याला पांगशा परिसरातील होसेनडांगा गावात मारण्यात आले. तो अ
बांगलादेशात मॉब लिंचींगचा बळी अमृत मंडल उर्फ सम्राट


ढाका, 25 डिसेंबर (हिं.स.) । बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात हिंसक मुस्लीम जमावाने आणखी एका हिंदू युवकाची सामूहिकमारहाण करून (मॉब लिंचींग) हत्या करण्यात आली. मृतक तरुणाचे नाव अमृत मंडल असून त्याला पांगशा परिसरातील होसेनडांगा गावात मारण्यात आले. तो अलीकडेच भारतातून बांगलादेशात परतला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार घटना बुधवारी रात्री सुमारे 11 वाजता कालीमोहोर युनियनमधील होसेनडांगा गावात घडली. मृत अमृत मंडल उर्फ सम्राट हा याच गावातील रहिवासी होता. या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद सलीम नामक इसमाला अटक केली आहे. सलीमकडून दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अमृत उर्फसम्राटचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजबारी सदर रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande