सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये मध्यरात्री येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव विद्युत रोषणाईत साजरा
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ (ख्रिसमस) सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त रात्री ठीक बारा वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्
सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये मध्यरात्री येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव विद्युत रोषणाईत उजळले चर्च;


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)

ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ (ख्रिसमस) सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त रात्री ठीक बारा वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली. या प्रसंगी संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक असलेला गोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना करत “हॅपी ख्रिसमस”च्या शुभेच्छा दिल्या.विशेष प्रार्थनेदरम्यान येशू ख्रिस्ताच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देण्यात आला. शांतता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या प्रार्थनेमुळे संपूर्ण चर्च परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव, महिला, युवक आणि बालकांची उपस्थिती होती.प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande