
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)
प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन हल्लेखोरांना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली तसेच दोन अल्पवयीनला ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेतील दोन आरोपींची परिसरातून धिंड काढली. संकेत सुभाषराव ईरपुडे उर्फ येडा (वय १९ रा. फ्रेजरपुरा) आणि शुभम उर्फ शुभ्भु इंदोले (वय २१ रा. श्यामनगर) अशी त्यांची नावे आहेत. स्थानिक तक्षशिला महाविद्यालयासमोर चार युवकांनी परिसरात राहणाऱ्या मुद्दसर शहादोन नासीर शहा याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तेथून पसार झाले होते. फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गुन्हेशाखेचे पथकसुध्दा समांतर शोध घेत होते. दरम्यान गुन्हेशाखेच्या पथकाने सायंकाळीच दोघांना अटक व अल्पवयीनला ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेतील दोन्ही आरोपींची परिसरात धिंड काढली. हल्लेखोरांना केविलवाण्या अवस्थेत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी