रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात संपन्न
* १५ पतसंस्थांचे ५८ प्रतिनिधींचा सहभाग रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग यांच्या वतीने लोणावळा येथील बॅसिलिका हॉटेल येथे “Unshakeable Recovery” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे यशस
रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे संपन्न


* १५ पतसंस्थांचे ५८ प्रतिनिधींचा सहभाग

रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)।

रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग यांच्या वतीने लोणावळा येथील बॅसिलिका हॉटेल येथे “Unshakeable Recovery” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सहकारी पतसंस्थांच्या कार्यपद्धतीत स्थैर्य, आर्थिक शिस्त व सक्षम व्यवस्थापन निर्माण करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिरासाठी कार्पोरेट को-ऑपरेटिव्ह कन्सल्टंट, कोच, ट्रेनर व लेखक संदीप पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील १५ सभासद पतसंस्थांचे एकूण ५८ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी तसेच कर्मचारीवर्गाचा समावेश होता. अलिबाग, मुरुड, उरण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव व महाड तालुक्यांतील पतसंस्थांचे प्रतिनिधी या शिबिरासाठी उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबागचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सहकार क्षेत्रातील बदलती आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान वसुली व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, संस्थात्मक स्थैर्य तसेच सहकार क्षेत्रातील सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, धोरणात्मक निर्णयप्रक्रिया आणि नेतृत्वगुण यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण सत्रे संवादात्मक असून प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असल्याने उपस्थितांना उपयुक्त ठरली.

या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघाचे सचिव योगेश मगर, महासंघ संचालक मंडळ तसेच कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande