कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बलाला डीपीडीसी-निधीतून ६ वाहने
कोल्हापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून पोलीस बल गट क्रमांक १६ साठी ६१ लाख ७ हजार रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी २ स्कॉर्पीओ व ४ बोलेरो अशा एकूण ६ शासकीय वाहनांचा पालकमंत्री प्रकाश आबिट
शासकीय वाहनांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते लोकार्पण


कोल्हापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून पोलीस बल गट क्रमांक १६ साठी ६१ लाख ७ हजार रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी २ स्कॉर्पीओ व ४ बोलेरो अशा एकूण ६ शासकीय वाहनांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम आपले पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसरात्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके हे नागमोडी, घाटमाथ्याच्या दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेला वेळेत पोहोचण्यासाठी जीप प्रकारातील छोटी, मजबूत व विश्वासार्ह वाहने अत्यावश्यक आहेत. ही बाब निदर्शनास येताच, ना. प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने प्रयत्न केले होते.त्यांनी जिल्हा नियोजन सामितीच्या निधीतून वाहानांसाठी निधी मंजूर केला. ही वाहने पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी, विशेषतः दुर्गम भागातील बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन मदत व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. पोलिस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असून, भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक व जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहील. याप्रसंगी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता व एस. आर. पी. एफ. समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande