अकोला काँग्रेसमध्ये राजीनाम्यामुळे खळबळ
अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहर (महानगर) काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला असून माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अफरोज खान लोढी यांनी महानगर सचिव पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अकोला काँग्रेसमध्ये राजीनाम्यामुळे खळबळ


अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहर (महानगर) काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला असून माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अफरोज खान लोढी यांनी महानगर सचिव पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अफरोज खान लोढी यांनी हा राजीनामा अकोला शहर (महानगर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. प्रशांत बानखेडे यांच्याकडे सादर केला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, गेली २० वर्षे ते पक्षाशी निष्ठेने कार्यरत असूनही आजपर्यंत त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही.

राजीनामा पत्रात त्यांनी असा आरोप केला आहे की, काही ठराविक व्यक्तींना वारंवार उमेदवारी देण्यात येत असून अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचत असून पक्षसंघटनावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या सर्व कारणांमुळे आपण पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून पक्ष नेतृत्वाने आपल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.या घडामोडीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी ही मोठी धक्का मानली जात असून, याचा पक्षाच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande