
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या सभास्थळ मंडप उभारणीच्या कामाचे, स्थळाचे विधिवत भूमीपूजन आज संजयजी पाचपोर (राष्ट्रीय संघटन मंत्री सहकार भारती) यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक अशोकजी कटारीया, अधिवेशन स्वागत समिती अध्यक्ष जयंत भातांबरेकर, सचिव सागर वैद्य, प्रा. प्रदीप वाघ, व्यंकटेश अवसरकर यावेळी प्रमुख उपस्थित होते.
अभाविप अधिवेशन हे केवळ एक विद्यार्थी एकत्रीकरण नसून समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज आहे. विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात जे जे निर्णय घेतले गेले ते सर्व निर्णय अभाविपने प्रत्यक्षात आणले. देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अधिवेशनात घेतले गेलेले सर्व निर्णय हे समाज उपयोगी बदल घडवतात हे अभाविपच्या अधिवेशनाचे महत्त्व आहे असे संजय पाचपोर यांनी यावेळी सांगितले.
अभाविप राष्ट्रभक्त विद्यार्थी घडवणारी संघटना असून परिषदेचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढत अशोक कटारिया यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाला अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री मेघा शिरगावे, अमोल गायकवाड, रूपेश पाटील, खुशबू चांडक यांच्यासह नाशिक महानगरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक विधी व मंत्रोच्चार, घोषणांनी भारवलेल्या वातावरणात या कार्यक्रम पार पडला.वातावरणात पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV