अकोला - भाजपचा 225 पेटीच्या माध्यमातून नव संकल्पनामा
अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)। राज राजेश्वर नगरीतील मतदार हे मालक असून आम्ही सेवक या भूमिकेत आहोत. मतदार राजाच्या मनातील विचार आणि विकास या संदर्भातले मत जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने साडेचारशे लोकांशी संपर्क केल्या असून प्रत्येक प्रभागात वेग
P


अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)। राज राजेश्वर नगरीतील मतदार हे मालक असून आम्ही सेवक या भूमिकेत आहोत. मतदार राजाच्या मनातील विचार आणि विकास या संदर्भातले मत जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने साडेचारशे लोकांशी संपर्क केल्या असून प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नागरिकांशी संवाद साधावा यासाठी 225 पेटीच्या माध्यमातून नव संकल्पनामा संदर्भातली मत जाणून घेण्यात येणार आहे ही कल्पना भारतीय जनता पक्षाच्या विचाराची सर्व स्पर्शी विकास करण्याचा संकल्प ची असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

भारतीय जनता पार्टी कार्यालयात संकल्पनामा संदर्भात दोनशे पंचवीस पेट्यांची वितरण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसणे हे होते तर मंचावर जिल्हा भाजपा अध्यक्ष संतोष शिवरकर, विजय अग्रवाल, किशोर पाटील वैशालीताई शेळके, चंदाताई शर्मा वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, पवन महल्ले विराजमान होते.

विकासात सर्वांचा सहभाग असणे ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेच्या मनातलं कार्यक्रम करून त्या दृष्टीने वाटचाल करत आहे अकोला भारतीय जनता पक्ष अकोला शहरातील नागरिकांचे मत आठ वर्षांपूर्वी जाणून त्याची 90% अंमलबजावणी केली होती आता पुन्हा मतदारांचे मत जाणून घेऊन संकल्पनामा प्रकाशित करण्यात येणार असून येत्या तीन दिवसात शहरातील 25000 नागरिकांशी संवाद साधून भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता या संदर्भातला पेटीच्या माध्यमातून हा अभियान राबवणार असल्याचे असल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.

विजय गडवाल यांनी भारतीय जनता पक्षांनी केलेल्या कामकाज तसेच आगामी कार्यक्रमासंदर्भात जनता जनार्दनांची मत जाणून घेण्यासाठी हा अभियान असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील विविध मान्यवरांसाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पेटी देऊन हा अभियान यशस्वी करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शर्मा यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande