
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या ८७ जागेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीत ६ लाख ७७ हजार १८० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण ७९७ मतदान केंद्र गठीत करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीकरीता ७ निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे ७ ठिकाणी वेगवेगळे कार्यालये आहेत.
आज एकूण ५६८ उमेदवार अर्जाची उचल करण्यात आली तर पाच उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले आहेत.
झोन निहाय
झोन क्रमांक १ - ७२
झोन क्रमांक २ - ७०
झोन क्रमांक ३ - ९६
झोन क्रमांक ४ - ७१
झोन क्रमांक ५ - ११८
झोन क्रमांक ६ - ५७
झोन क्रमांक ७ - ८४
एकूण उचल - ५६८
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी