नवनिर्वाचित नगरसेवकाच्या मुलाने केली आत्महत्या
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)। बीड शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अशोक काळे यांच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र नवनिर्वाचित नगरसेवकाच्या मुलाने गळफा
नवनिर्वाचित नगरसेवकाच्या मुलाने केली आत्महत्या


बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।

बीड शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अशोक काळे यांच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र नवनिर्वाचित नगरसेवकाच्या मुलाने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.

त्याचे वडील अशोक काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

क्रमांक १ मधून निवडून आले आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेल्या त्याने वडिलांचा प्रचार करून युवकांचे संघटन त्यांच्यामागे उभे केले होते. तो राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. अद्याप या प्रकरणात कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती पोलिसांना दिली गेली नसल्याने नोंद करण्यात आली नव्हती. सध्या कुटुंब जबाब देण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांचा नंतर जबाब नोंदवला जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी आत्महत्येचे कारण सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande