छ. संभाजीनगरात निवडणूक मुख्य समन्वय समितीची महत्त्वाची बैठक
छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका २०२५–२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक मुख्य समन्वय समितीची महत्त्वाची बैठक वातावरणात पार पडली. येत्या महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती अधिक प्रभावी कशी करता येईल,
Q


छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका २०२५–२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक मुख्य समन्वय समितीची महत्त्वाची बैठक वातावरणात पार पडली.

येत्या महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती अधिक प्रभावी कशी करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत निवडणूक व्यवस्थापन, विभागनिहाय समन्वय, प्रचाराची दिशा, संघटन बळकट करण्याचे उपाय तसेच पुढील टप्प्यातील कृती आराखडा याबाबत स्पष्ट भूमिका ठरवण्यात आली. प्रत्येक घटकाला जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याचे आवाहन केले.

सर्व पदाधिकारी, समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande