
छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)।
वीर बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयात गुरु श्री गोविंदसिंहजी महाराजांच्या चार साहिबजाद्यांना अभिवादन करण्यात आले..
देश, धर्म आणि सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी अल्पवयात महान बलिदान अर्पण करणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य, त्याग आणि धैर्य भारतीय इतिहासातील अमर प्रेरणा आहे. त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठेची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवणारे आहे.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब दानवे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार श्री.संजय केनेकर, आमदार श्री.नारायण कुचे, विभागीय संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, भाजप शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, माजी महापौर श्री.भगवान घडामोडे, श्री.समीर राजूरकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis