
कोल्हापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।
बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे, दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदूविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांच्याकडे हिंदूविरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालावेत यांसह बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे कोल्हापूर येथे करण्यात आली. हे आंदोलन २६ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौक (शिवतीर्थ) करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे महेश जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक दिलीप भिवटे, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. सुनील सामंत, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे यांनी केले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात भारत-बांगलादेश कराराद्वारे अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, संयुक्त राष्ट्र व मानवाधिकार आयोगावर मुद्दा उपस्थित करून फॅक्ट-फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व व पुनर्वास धोरण, मंदिरे व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवाद यंत्रणा उभारण्यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वांत मोठा हिंदूबहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अर्जुन आंबी, कृष्णात यादव, पूजा शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सुरेश धनगर, जुना बुधवार पेठेचे सुशील भांदिगरे, हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, विश्व हिंदु परिषषदे चे जिल्हामंत्री विनय बारड, सतीश मांगले, उद्योजक योगेश केसरकर, हिंदुत्वनिष्ठ सविता कांबळे, सर्वश्री आनंदराव काशीद, नितीन काकडे, प्रतिक हजारे, जयवंत ठक्कर, मनोजकुमार चौगुले, कैलास दीक्षित हिंदु महासभेचे रमेश भोरे, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री पराग फडणीस, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विजय गुळवे, विजय चौगुले, अवधूत चौगुले, मंदिर महासंघाचे अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कायकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar