
हिंगोली, 26 डिसेंबर (हिं.स.)।
हिंगोली जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी रिक्त असलेल्या ठिकाणाकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसह अर्ज दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
अर्जाचा नमुना, संपूर्ण जाहिरात, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया, अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती https://hingoli.nic.in/en/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी वेळोवेळी वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे.
या संदर्भात कोणतेही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाहीत तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis