जळगावच्या तापमानात पुन्हा वाढ
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) जळगावचा किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसवर पोहोचला. यामुळे हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे.गुर
जळगावच्या तापमानात पुन्हा वाढ


जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) जळगावचा किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसवर पोहोचला. यामुळे हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे.गुरुवारी तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. शहर व जिल्ह्याच्या हवामानात गेल्या सात दिवसांत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. १८ डिसेंबर रोजी तापमान ८.७ अंशांवर होते, तर २४ डिसेंबरपर्यंत ते सरासरी ९.७ अंशांच्या आसपास स्थिरावले होते.मात्र, २५ डिसेंबर रोजी यात वाढ होऊन पारा १० अंशांवर गेल्याने थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत २० डिसेंबर हा दिवस जळगावकरांसाठी सर्वाधिक कडाक्याच्या थंडीचा ठरला. या दिवशी जिल्ह्याचे तापमान ६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी पातळीवर आले होते. या नीचांकी तापमानामुळे संपूर्ण जिल्ह्यात शीतलहरीचा प्रभाव जाणवला होता आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असून मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande