नाशिक मनपासाठी मविआ सर्व जागा लढवणार
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। - महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन दिवसात पूर्ण तिकीट वाटप करण्याचा निर्णय झाला असून सर्व जागा लढविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये महापालिका निवडणूक लक
नाशिक मनपासाठी महाविकास आघाडी सर्व


नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।

- महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन दिवसात पूर्ण तिकीट वाटप करण्याचा निर्णय झाला असून सर्व जागा लढविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यामध्ये महापालिका निवडणूक लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली ही युती होत असताना नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून स्थानिक नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार ज्येष्ठ नेते वसंत गीते,मनसेचे अंकुश पवार, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शरदक्ष गजानन शेलार सातत्याने नाशिक मध्ये महाविकास आघाडी व्हावी म्हणून प्रयत्न करत होते . प्रयत्नात काही ना काही अडचणी येत होत्या परंतु त्यावरही मात करून या नेत्यांनी नाशिकमध्ये राज्यात नाशिकला महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रयत्न केले अखेर या प्रयत्नांना यश येत असल्याचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सांगत आहेत

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्यानंतर नाशिक मध्ये महाविकास आघाडी करण्याबाबत गुरवारी रात्री मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीतील सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबाबत दोन दिवसात महाविकास आघाडीचे उमेदवार हे घोषित केले जाणार आहेत उमेदवारांशी चाचपणी करण्यात आली असून त्यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्याचे देखील एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले या नेत्याने अधिक माहिती देताना सांगितले की जे निवडून येतील अशाच उमेदवारांना आम्ही तिकीट देणार आहे त्यांच्याशी त्या पद्धतीप्रमाणे चर्चा देखील केलेली आहे म्हणजेच निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नाशिक महानगरपालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय हा झालेला आहे या निमित्याने नाशिक मध्ये भाजपा विरोधात महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकला चलो रेची भुमिका

महा युतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नुकतीच बैठक झाली या बैठकीमध्ये मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नाशिकमध्ये निर्णय घेताना स्वतंत्र पद्धतीप्रमाणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असून त्याबाबत स्थानिक स्तरावरती आदेश दिलेले आहेत. त्यामुळे इथे आवश्यकता पडली तर स्थानिक नेते मंडळी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जर मित्र पक्षांची युती करावयाची असेल तर त्यासाठी आता फक्त दोन दिवसाचा कालावधी उरलेला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर काय निर्णय होतो याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande