माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी
अजित पवार यांची भेट घेऊन धारूर येथील शिष्टमंडळाने निवेदन दिले बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून करण्यात आली. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी


अजित पवार यांची भेट घेऊन धारूर येथील शिष्टमंडळाने निवेदन दिले

बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून करण्यात आली. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धारूर येथील शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सोळंके हे २००१ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते जेष्ठ, अनुभवी आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांनी यापूर्वी सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. परभणीचे पालकमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. या मंडळाच्या शाळा आणि कॉलेज मराठवाड्यात विविध जिल्ह्यांत आहेत. माजलगाव सहकारी साखर कारखान्यात ते गेली ३० वर्षे कार्यरत आहेत. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल, असे मत शिष्टमंडळाने मांडले.

त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, राजेभाऊ मुंडे, महादेव शिनगारे, अमोल जगताप, मयूर सावंत, लक्ष्मण सिरसट, आवेज पुरेशी, सय्यद हरून, नितीन शिनगारे, गणेश सावंत, शेख गफार, आदींनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande