साधूग्राम जागेची प्रमुख आखाड्यांच्या महंतांकडून पाहणी
कुंभमेळ्यापूर्वी गोठ्याची जागा अन्यत्र हलविण्याची मागणी नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत प्रमुख आखाड्यांच्या महंतांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल त्यांनी तपोवन येथील साधुग्राम परिसरातील ज
साधूग्राम जागेची प्रमुख आखाड्यांच्या महंतांकडून पाहणी


कुंभमेळ्यापूर्वी गोठ्याची जागा अन्यत्र हलविण्याची मागणी

नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत प्रमुख आखाड्यांच्या महंतांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल त्यांनी तपोवन येथील साधुग्राम परिसरातील जागेची पाहणी केली. यावेळी परिसरातील वृक्षांची पाहणी करून प्रमुख आखाड्यांच्या जागेत किती वृक्ष

आहेत, याचा आढावा घेण्यात आला. तसेच बटुक हनुमान मंदिर परिसरात असलेल्या काठेवाडी गायीच्या गोठ्याची जागा कुंभमेळ्यापूर्वी अन्यत्र हलविण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. यावेळी दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी आखाडा तसेच निर्मोही आखाडा यांच्या साधुग्राममधील जागांचीही पाहणी करण्यात आली.

या प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री तथा निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज, हरीश मकवाना, योगेश बर्वे आदी उपस्थित होते. तपोवन येथे सुरू असलेल्या एसटीपी प्लांटच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande