नांदेड: बॅग लुटणारी आंतरराज्य टोळी एलसीबी, वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात
नांदेड, 26 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड शहर व परिसरात बॅग लुटून परराज्यात आसरा घेणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून अटक करून त्यांच्याकडून नगदी १८ लाख रु
नांदेड: बॅग लुटणारी आंतरराज्य टोळी एलसीबी, वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात


नांदेड, 26 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड शहर व परिसरात बॅग लुटून परराज्यात आसरा घेणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून अटक करून त्यांच्याकडून नगदी १८ लाख रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शहराच्या जुना मोंढा भागात एका ऑइल मिल व्यापाऱ्याचे चार चाकी वाहन पंक्चर करून जवळपास ३० लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास इतवारा, वजिराबाद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. वरिष्ठांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आपल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पथकांना हा गुन्हा उघडकीस करण्याचे आदेश दिले. चार टिम तयार करून जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ५० लोकांच्या सायबर फुटप्रिंट व १५ लोकांचे नेटग्रीड डीटेल्स् तपासण्यात आले. आरोपीचा शोध घेण्याकरिता कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबई, बिदर, कर्नाटक राज्य तसेच तेलंगाना राज्य येथे गुन्ह्यांच्या अनुषंगाने रवाना होऊन स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवून बॅग लिफ्टींगचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत होते.

बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बॅग लिफ्टींगचा गुन्हा केलेले आरोपी हे जिल्हा शिमोगा राज्य कर्नाटक येथील आहेत. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पथक जिल्हा शिमोगा राज्य कर्नाटक येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेवुन तिथे तीन ते चार दिवस मुक्काम केला . आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे भद्रावती जिल्हा शिमोगा येथे आहेत. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून दि. १८ डिसेंबर रोजी आरोपी यास ताब्यात घेवून पो.स्टे. वजिराबाद नांदेड येथे हजर करण्यात आले. तपासात पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आरोपीकडून नगदी १८ लाख रूपये जप्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande