धुळ्यात गावठी पिस्तुलासह सराईत जेरबंद
धुळे , 26 डिसेंबर (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी असामाजिक घटकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराई
धुळ्यात गावठी पिस्तुलासह सराईत जेरबंद


धुळे , 26 डिसेंबर (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी असामाजिक घटकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून देशी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल व मोटारसायकल असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार त्यांच्या आधीपत्याखालील पथकास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २४ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धुळे शहरातील मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी एका संशयित व्यक्ती चौकशी केली असता तो विठ्ठल वामन भोळे असल्याचे उघड झाले. त्याच्या अंगझडतीत देशी गावठी कट्टा आढळला. हे शस्र विक्रीच्या उद्देशाने त्याने स्वत...जवळ बाळगले असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली आणि भलतीच धक्कादायक माहिती बाहेर पडली.त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा,तीन हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे, एक हजाराचा मोबाईल हँडसेट आणि ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करीत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी विठ्ठल वामन भोळे हा अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याची नवी माहिती तपासात उघड झाली आहे. भुसावळ येथील बाजार पेठ पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात त्याला २६ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली असून,तो सद्या पॅरोल रजेवर आहे. या नंतरही विठ्ठल भोळे हा चोरी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे तसेच खरेदी- विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपीविरुद्ध भुसावळ, जळगाव, धुळे व पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, घरफोडी, चोरी, जबरी चोरी, फसवणूक तसेच शस्त्र कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande