
ठाणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (26.12.2025) ठाणे शहरातील 9 प्रभागातून आज एकूण 1008 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभागसमितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
तर कळवा प्रभाग समिती येथून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) पूजा राजेंद्र शिंदे व अभिजीत अंकुश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे सादर केला.
दिनांक 23, 24, व 26 डिसेंबर 2025 या तीन दिवशी मिळून एकूण 3078 उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले.
*प्रभागसमितीनिहाय आकडेवारी*
*(प्रभाग क्रमांक 1,2,3,8) माजिवडा मानपाडा प्रभागसमिती - 113*
*(प्रभाग क्रमांक 4,5,7) वर्तकनगर प्रभागसमिती - 128*
*(प्रभाग क्रमांक 6,13,14,15) लोकमान्य सावरकर प्रभागसमिती - 146*
*(प्रभाग क्रमांक 16,17,18) वागळे प्रभागसमिती - 115*
*(प्रभाग क्रमांक 19,20,21,22) नौपाडा- कोपरी प्रभागसमिती – 94*
*(प्रभाग क्रमांक 10,11,12) उथळसर प्रभागसमिती - 44*
*(प्रभाग क्रमांक 9,23,24,25) कळवा प्रभागसमिती - 81*
*मुंब्रा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 26,31, 30, 32) – 180*
*दिवा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 27,28, 29, 33) – 107*
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर