
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।
परळी नगर परिषदेत झालेल्या पराभवानंतर दीपक देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला
परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे पती दिपक देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर तोडले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे समर्थकांकडून धमक्या मिळाल्या. मात्र, याबाबत कुठेही तक्रार दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महायुतीच्या उमेदवार पद्मश्री
घर्माधिकारी यांच्या विरोधात पत्नी संध्या देशमुख यांना रिंगणात उतरवले. धर्माधिकारी यांना २८ हजार १०९ मते मिळाली. संध्या देशमुख यांना १२ हजार ५३६ मते मिळाली. दिपक देशमुख यांचा प्रभाग क्रमांक ६ मध्ये ७२० मतांनी पराभव झाला. २४ डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १० मधील एका मतदान केंद्रावर ३०७ मते मिळाली. मात्र, उर्वरित ८७ केंद्रांवर २७० ते ३०० च्या पुढे मतदान झाले नाही. हा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीदरम्यान धर्माधिकारी यांच्याकडून धमक्या आल्याचा आरोप त्यांनी केला.
देशमुख यांनी त्यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केले. आपल्याला जीवितास घोका असल्याचे सांगत देशमुख यांनी परळी नगरपालिकेची निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यावी, असा आग्रह घरला. त्यासाठीचा सर्व खर्च देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाबा शिंदे, उत्तम माने, महादेव गंगणे, शेख शरीफ, नितीन चव्हाण, पंडित झिंजुर्डे, संजय जगतकर उपस्थित
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis