मानसिक अशांतीतून मुक्त होण्यासाठी आत्मओळख आणि मनःशांती अत्यंत आवश्यक :राजयोगिनी उषादीदी
मनःशांती ते समृद्ध जीवन या विषयावर रोटरी क्लबचा विशेष कार्यक्रम बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)। आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस भौतिकदृष्ट्या प्रगत होत असला तरी मानसिकदृष्ट्या अधिक तणावग्रस्त, अस्थिर व असमाधानी होत आहे. या मानसिक अशांतीतून मुक्त होण्यासाठी
मानसिक अशांतीतून मुक्त होण्यासाठी आत्मओळख आणि मनःशांती अत्यंत आवश्यक :राजयोगिनी उषादीदी


मनःशांती ते समृद्ध जीवन या विषयावर रोटरी क्लबचा विशेष कार्यक्रम

बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।

आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस भौतिकदृष्ट्या प्रगत होत असला तरी मानसिकदृष्ट्या अधिक तणावग्रस्त, अस्थिर व असमाधानी होत आहे. या मानसिक अशांतीतून मुक्त होण्यासाठी आत्मओळख आणि मनःशांती अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल पीस स्पीकर व माउंट अबू येथील बालब्रह्मचारिणी राजयोगिनी उषादीदी यांनी केले.

रोटरी इंटरनॅशनल व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन या ध्येयाशी सुसंगत असा 'मनःशांती ते समृद्ध जीवन' या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ बीड, रोटरी क्लब ऑफ बीड सिटी तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंटरनॅशनल पीस स्पीकर व माउंट अबू येथील बालब्रह्मचारिणी राजयोगिनी उषादीदी यांनी आधुनिक जीवनातील वाढता मेंटल स्ट्रेस, अस्थिरता व अशांती यावर प्रभावी मार्गदर्शन केले. मनःशांती, आत्मओळख, पॉझिटिव्ह थिंकिंग व राजयोग मेडिटेशन यांच्या माध्यमातून समृद्ध व संतुलित जीवन कसे घडवता येते, याचे त्यांनी अत्यंत प्रेरणादायी विवेचन केले. याच कार्यक्रमात सोलापूर येथील प्रजापिता ब्रह्कुआमारी ईश्वरीय

विश्वविद्यालयाच्या ब्रह्माकुमारी सोनप्रभा दीदी यांनीही उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम घेण्यामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बीड यांच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रज्ञा दीदी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष राहुल बोरा यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी यांनी आपल्या मनोगतातून करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande