
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।
बीड शहराजवळ असलेल्या पालवण येथील सह्याद्री देवराई या वन प्रकल्पाला मोठी आग लागली होती. ही आग लागल्याचे समोर आले आहे. याबाबत वन विभागाने अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही नोंद केला आहे. दरम्यान, आग मोठी होती, मात्र यात गवत अधिक प्रमाणात जळाले असून, २५ ते ३० झाडांनाच आगीची झळ पोहचली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.
बीड शहरापासून जवळ असलेल्या पालवण परिसरातील डोंगरावर वन विभाग व अभिनेते सयाजी शिंदे यांच्या एकत्रित प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी सह्याद्री देवराई हे वन विकसित केले.विविध प्रकारची हजारो झाडे इथे
आहेत. इथे काही वर्षांपूर्वी जगातील पहिले वृक्षसंमेलन झाले होते. या प्रकल्पात अचानक वणवा पेटला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली होती
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis