
सोलापूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। शिवभोजन केंद्राचा फोटो काढून नितीन कांबळे (रा. सदर बझार) याने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याने दरमहा हप्ता घेतला. आता रक्कम वाढवून मागत असून, त्याने २० हजारांची खंडणी मागितल्याची फिर्याद इरफान युन्नुस शेख (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी या प्रकरणी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून नितीन कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर कांबळे याने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करत शिवभोजन केंद्राची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी व्हावी, असा अर्ज दिला. त्यानुसार केंद्राची तपासणीही झाली. त्यानंतर ८ मार्च २०२५ रोजी कांबळे याने ‘तू परिमंडळ अ व ब विभागातील शासकीय शिवभोजन चालकांकडून प्रतिमहा ७०० रुपये हप्ता द्यावा’ मी तक्रारी अर्ज मागे घेतो’ असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड