साेलापुरात निवृत्त बॅंक अधिकाऱ्याला ६० लाखांचा गंडा
सोलापूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। नवीन आरटीओ ऑफिसजवळ राहणाऱ्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सायबर गुन्हेगारांनी ६० लाख रुपयाचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास खूप जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखविले होते. ५ जुलै ते १७ डिसेंबर या स
साेलापुरात निवृत्त बॅंक अधिकाऱ्याला ६० लाखांचा गंडा


सोलापूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। नवीन आरटीओ ऑफिसजवळ राहणाऱ्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सायबर गुन्हेगारांनी ६० लाख रुपयाचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास खूप जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखविले होते. ५ जुलै ते १७ डिसेंबर या सहा महिन्यांत त्यांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले, घरातील दागिने मोडले, स्वत:चेही पैसे त्यात गुंतवले होते. सोलापूर शहर सायबर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सायबर गुन्हेगाराने बनावट फेसबूक आयडी तयार करून निवृत्त बॅंक अधिकाऱ्यांना मेसेज पाठविला. त्यावर शेअर मार्केटबद्दल माहिती होती. त्यावर क्लिक केल्यावर फिर्यादीचा नंबर सायबर गुन्हेगारांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट झाला. त्या ग्रुपवर शेअर मार्केटसंदर्भात इतर बनावट सदस्य खूप फायदा झाल्याचे बोलत होते. त्या खोट्या मेसेजला बळी पडलेल्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्याने सुरवातीला ३० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना काही दिवसांतच आठ- दहा हजाराचा फायदा मिळाल्याचे दाखविले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande