सोन्या–चांदीचे दर गगनाला भिडले
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) सोने आणि चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने मोठी वाढ होत असून दोन्ही मौल्यवान धातू विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत असून दागिने खरेदी करणे अधिकच महाग झ
सोन्या–चांदीचे दर गगनाला भिडले


जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) सोने आणि चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने मोठी वाढ होत असून दोन्ही मौल्यवान धातू विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत असून दागिने खरेदी करणे अधिकच महाग झाले आहे. दरम्यान, आज शुक्रवारीही सोन्याने नवा उच्चांक गाठल्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे. आज जळगावच्या सुवर्णबाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तोळ्यामागे तब्बल ७७० रुपयांची वाढ झाली असून एक तोळा सोन्याचा भाव १ लाख ४० हजार २० रुपयांवर पोहोचला आहे. याचबरोबर ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१६ रुपयांनी वाढून १ लाख १२ हजार १६ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ कायम असून प्रति तोळा ७०० रुपयांनी वाढत १ लाख २८ हजार ३५० रुपये इतका भाव नोंदविण्यात आला आहे. ८ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६० रुपयांनी वाढून १ लाख २ हजार ६८० रुपये झाला असून १० तोळा सोन्याचे दर थेट ७ हजार रुपयांनी वाढून १२ लाख ८३ हजार ५०० रुपयांवर गेले आहेत.आज पुन्हा जळगावातील सराफ बाजारात चांदीनेही जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात १ हजार ३० रुपयांची वाढ झाल्याने एक किलो चांदीचा दर सव्वा दोन लाखांचा टप्पा ओलांडत थेट २ लाख २८ हजार ६६० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे सोन्याचा भाव काही ठिकाणी १ लाख ४१ हजारांच्या आसपास पोहोचल्याची चर्चा असून, सोन्या–चांदीच्या या आश्चर्यकारक दरवाढीमुळे येत्या काळात बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande