
छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)। वैजापूर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दणदणीत फडकला हा कौल म्हणजे भाजपच्या कामगिरीवर जनतेने दिलेली ठाम मान्यता आहे.असे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले
वैजापूर नगरपरिषदेवर याआधीही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्या कार्यकाळात केलेल्या भरीव विकासकामांवर, पारदर्शक कारभारावर व लोकाभिमुख निर्णयांवर विश्वास ठेवत, वैजापूरच्या जागरूक आणि सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीलाच निर्विवाद कौल दिला आहे. हा कौल म्हणजे भाजपच्या कामगिरीवर जनतेने दिलेली ठाम मान्यता आहे.
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिनेश परदेशी यांनी विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत वैजापूर नगरपरिषदेवर सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा अभिमानाने रोवला आहे. तसेच नगरसेवक पदासाठीही भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले असून, या निकालातून शहरातील प्रत्येक घटकाने भाजपच्या विकासनीतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिनेश परदेशी व विजयी नगरसेवकांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत आनंद व्यक्त केला. या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैजापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा व नागरी सोयी-सुविधांमध्ये ठोस सुधारणा झाल्या आहेत. याच विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवत नागरिकांनी पुन्हा एकदा नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
या दणदणीत विजयासाठी वैजापूर शहरातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार, तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व अहोरात्र मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. वैजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कटिबद्ध असून, हा विजय म्हणजे विकासाच्या राजकारणाचा निर्णायक विजय आहे.
पुन्हा एकदा वैजापूर नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिमाखात फडकत आहे असे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis