पिंपरीत अजित पवारांना भाजपकडून कडवे आव्हान
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। महायुतीमधील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर शहरातील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाक
ajit pawar


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

महायुतीमधील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर शहरातील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले गेले आहे.अजित पवारांकडे मुलाखत देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ ताकदवान माजी नगरसेवकांच्या हाती कमळ दिले. भाजपच्या चारही आमदारांनी महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर, महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी अजित पवार यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेतृत्व, की राज्याचे नेतृत्व करणारे अजित पवार वरचढ ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.औद्योगिक, कामगारनगरी, आयटी हब बनलेले पिंपरी-चिंचवड शहर जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे शहरावर सलग १५ वर्षे एकहाती वर्चस्व होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande