सिंधुदुर्ग : 'बीज अंकुर अंकुरे'च्या लेखकांचा गौरव सोहळा उत्साहात
सिंधुदुर्ग, 27 डिसेंबर, (हिं. स.) : ''बीज अंकुर अंकुरे'' पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुस्तकांच्या लेखकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कोमसापच्या मालवण शाखेने २०२३ मध्ये १८ ललित लेखकांच्या सहाय्याने ''बीज अंक
'बीज अंकुर अंकुरे'च्या लेखकांचा गौरव सोहळा


सिंधुदुर्ग, 27 डिसेंबर, (हिं. स.) : 'बीज अंकुर अंकुरे' पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुस्तकांच्या लेखकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

कोमसापच्या मालवण शाखेने २०२३ मध्ये १८ ललित लेखकांच्या सहाय्याने 'बीज अंकुरे अंकुरे' हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोमसापच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी संपादित केले होते. त्याला अलीकडेच कोमसापचा आदर्श संपादित ललित पुस्तकाचा वाङ्मयीन पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने त्या १८ ललित लेखकांचा गौरव सोहळा आचरे येथे कोमसापच्या कार्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी सुरेश ठाकूर होते. प्रमुख मान्यवर म्हणून रुजारिओ पिंटो (मालवणी कवी), सुनंदा कांबळे (ज्येष्ठ कवयित्री) उपस्थित होते.

यावेळी बीज अंकुरे अंकुरे पुस्तकातील -पूर्वा मनोज खाडिलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, शिवराज विठ्ठल सावंत, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक धोंडू कांबळी आणि गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर या १८ लेखकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरव करण्यात आला .यावेळी कवी मंदार सांबारी यांनी 'मालवण कोमसाप की जय' हे स्फूर्तिगीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी पाठविलेल्या शुभेच्छा तेजल ताम्हणकर यांनी सभागृहात वाचून दाखवल्या. आत्माराम नाटेकर यांच्या गौरवपत्राचे अभिवाचन उज्ज्वला धानजी यांनी केले.

यावेळी मंदार सांबारी आणि गिरीधर पुजारे यांना गानकवी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेहा बापट आणि चंद्रकला दिवेकर यांना आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार, तर द. शि. हिर्लेकर गुरुजी यांच्या आत्मचरित्राला गेल्या सहा महिन्यांत सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने षट्कार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सुधाकर वळंजू यांना तज्ज्ञ परीक्षक आणि स्नेहा नारिंगणेकर यांना चोखंदळ वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि ग्रंथभेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

रुजारिओ पिंटो यांना कविता राजधानी पुरस्कार मिळाल्यामुळे मालवण कोमसापतर्फे रामेश्वर वाचन मंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे आणि आचरा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी या कोमसापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरविण्यात आले. सुनंदा कांबळे यांनी त्यांना ओवाळून पिंटो यांच्यावर एक मालवणी गौरवगीत सादर केले.

सत्काराला उत्तर देताना रुजारिओ पिंटो म्हणाले, मी कवी म्हणून पुढे येण्यासाठी मला कोमसापची साथ लाभली. मालवणच्या सर्व लेखक-कवींनी कोकण मराठी साहित्य परिषदेचा लाभ घेऊन मोठे व्हावे. .बीज अंकुरे अंकुरेच्या सर्व अठरा लेखकांचे मी कौतुक करतो आणि पुस्तकाची दुसरी आवृत्ती यावी, अशा शुभेच्छा देतो.अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले कोमसाप ही संस्था नसून ही एक चळवळ आहे. या अक्षरदिंडीत जे जे सहभागी झाले आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार लाभले, त्या सर्वांचे अध्यक्ष या नात्याने मी कौतुक करतो. सर्व कार्यकर्त्यांनी अशीच साहित्यसेवा करून कोमसापचा ध्वज मराठी साहित्य विश्वात सदैव फडकत ठेवावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande