
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
गंगाखेड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यासह तालुकाध्यक्षपदाचा तडका फडकी राजीनामा आज फेकून दिला. गंगाखेड तालुक्यात काँग्रेस पक्षाची वाढ करण्यात गोविंद यादव यांचा मोठा वाटा होता परंतु त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला .
काँग्रेसच्या नेतृत्वाने गंगाखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणतीही साथ दिल्या नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक गंगाखेड कडे दुर्लक्ष केले असा आरोप करीत यादव म्हणाले की, जिल्हाध्यक्ष या नात्याने जी जबाबदारी संपन्न करायला पाहिजे होती ती त्यांनी केली नाही.
सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करूनच आपण पुढील दिशा ठरवू असे त्यांनी सांगितले.गंगाखेड नगरपरिषदेत काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. पालक म्हणून जिल्हाध्यक्षांनी दुर्लक्ष केले. खरंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गंगाखेडला काँग्रेसला अनुकूल वातावरण होते. परंतु काँग्रेस नेत्यांनी संपूर्णपणे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले नाही.
आपले वैयक्तिक संबंध सर्व पक्षांची आहे पक्षातील नेत्यांचीही संबंध आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर मधूसुदन केंद्रे, रत्नाकर गुट्टे यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच आपण काहीतरी नवीन सुरुवात करणार आहोत जुने गेले मरणा लागू नये हे वाक्यही त्यांनी वापरले
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis