रत्नागिरी : नगरसेवक बंटी कीर यांच्या पुढाकाराने मांडवी किनाऱ्यावर सफाई
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : मांडवीचे नवनिर्वाचित नगरसेवक बंटी कीर यांच्या पुढाकाराने आज मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वर्षअखेरीस कोकणात दाखल झालेले लाखो पर्यटक किनाऱ्यांवर फिरत आहेत. रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध गेट वे
नगरसेवक बंटी कीर यांच्या पुढाकाराने मांडवी किनाऱ्यावर सफाई


रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : मांडवीचे नवनिर्वाचित नगरसेवक बंटी कीर यांच्या पुढाकाराने आज मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

वर्षअखेरीस कोकणात दाखल झालेले लाखो पर्यटक किनाऱ्यांवर फिरत आहेत. रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध गेट वे ऑफ रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावरील अस्वच्छतेची नगरसेवक बंटी कीर यांनी त्वरित दखल घेतली. मांडवी किनारा आणि संपूर्ण परिसराची साफसफाई, पर्यटन वाढ, वाहतूक व्यवस्थापन आणि व्यावसायिक शिस्त या सगळ्या मुद्द्यांवर खूप स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका मांडली. यावेळी मांडवीची श्री देव भैरी देवस्थानचे विश्वस्त, माजी नगरसेवक नितीन तळेकर, बंड्या सुर्वे, प्रसाद सुर्वे आणि हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकुरदेसाई आदी उपस्थित होते.

याबाबत श्री. ठाकूरदेसाई यांनी सांगितले की, प्रशासनाची इच्छाशक्ती आहे आणि व्यावसायिकांची साथ मिळाली तर आपण सगळे मिळून मांडवी किनाऱ्याला एक वेगळे, आदर्श आणि अनुकरणीय बिझनेस मॉडेल नक्कीच उभे करू शकतो. हा किनारा केवळ व्यवसायाचा नाही, तो रत्नागिरीची ओळख, पर्यटनाची शान आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचा वारसा आहे. आजचा विश्वास, आजची ऊर्जा आणि आजची एकजूट उद्या मांडवीला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande