लातुरात दिव्यांग महोत्सव उत्साहात संपन्न
लातूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अ‍ॅड. निलम शिर्के - सामंत यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव यहाँ के हम सिकंदर लातूर शाखेच्या वतीने स्टिम एज्युकेशन सेंटर लातूर येथे मोठ्या दिमाखात स
लातुरात दिव्यांग महोत्सव उत्साहात संपन्न; 26 शाळेतून 350 विशेष मुलांचा उत्स्फूर्त सहभाग.


लातूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अ‍ॅड. निलम शिर्के - सामंत यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव यहाँ के हम सिकंदर लातूर शाखेच्या वतीने स्टिम एज्युकेशन सेंटर लातूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, मुंबई शाखेचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, स्टिम एज्युकेशन सेंटर चे ओमप्रकाश झुरुळे, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्याण बरमदे, सिने अभिनेते अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बिराजदार, स्टिम च्या प्राचार्य पुनम पाठक, बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, समिती प्रमुख सुवर्णा बुरांडे या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज पूजन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे मनोगतात म्हणाले की दिव्यांग बालकांसाठी बालरंगभूमी वर्षभर कार्यरत राहणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा व संघांनी सहभाग नोंदवावा. या कलामहोत्सवात सादरीकरण करणाऱ्या बालकलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ओमप्रकाश झुरुळे, डॉ. कल्याण बरमदे, संतोष बिराजदार यांनी आपापली मनोगते व्यक्त केली व सर्वाना शुभेच्छा दिल्या. भव्यदिव्य असा संपन्न झालेला पाहून आलेल्या शाळांनी बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे कौतुक केले.

या कलामहोत्सवामध्ये 26 दिव्यांग शाळेतील 350 बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. तर अनेक शाळांनी मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लावला त्यात अनेक वस्तूंची विक्री झाली. दिव्यांग बालकलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सदरीकरणांनी सर्व रसिक प्रेक्षक भारावून गेले आणि रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद दिला.

या महोत्सवाचे प्रास्ताविक समिती प्रमुख सुवर्णा बुरांडे यांनी केले, सूत्रसंचालन वनिता गोजमगुंडे आणि वसुधा पाटील यांनी केले तर आभार लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य यांनी केले.

सदरील कलामहोत्सव यशस्वीतेसाठी लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, समिती प्रमुख सुवर्णा बुरांडे, कार्याध्यक्ष मयूर राजापुरे, प्रमुख कार्यवाह नवलाजी जाधव, कोषाध्यक्ष रवि अघाव, सहकार्यवाह रविकिरण सावंत तसेच वनिता गोजमगुंडे, महेश बिडवे, विशाल वाटवडे, प्रिती ठाकूर, महेश बिडवे, वसुधा पाटील, महेश पवार, तेजश्री घवले, सलीम पठाण, तन्मय रोडगे, ऋतुराज सुरवसे, शरीफ पठाण, हिरा वेदपाठक, सुमती बिडवे सोमवंशी यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande