आरटीआय आदेशांवर पुणे विद्यापीठाची पळवाट?
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। माहिती अधिकार कायद्यांतर्गत दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना कागदपत्रे पाहण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे. याबाबत उच्च
University Pune SPUU


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

माहिती अधिकार कायद्यांतर्गत दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना कागदपत्रे पाहण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्वतंत्र आदेश दिले नसल्याची तांत्रिक पळवाट काढत विद्यापीठाने शासनाच्या आदेशालाच हरताळ फासल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.वेलणकर यांनी १५ डिसेंबर रोजी कुलगुरूंना पत्र लिहून प्रशासनाच्या २६ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. पुणे महापालिकेच्या धर्तीवर विद्यापीठातही दर सोमवारी दोन तास कागदपत्रे पाहण्याची सुविधा मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता. त्यावर विद्यापीठाने म्हटले आहे की, सामान्य प्रशासन विभागाचे आदेश आम्हाला लागू होत नसून, जोपर्यंत उच्च व तंत्रशिक्षण स्वतंत्र आदेश काढत नाही, तोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande