काकाचे राष्ट्रवादी कार्यालयापुढे आंदोलन; दुसरीकडे पुतण्या शिवसेनेत दाखल
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे माजी महापौर जेष्ठ नेते मनोहर सपाटे यांनी शहराचे अध्यक्ष महेश गादेकर आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्षाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदो
काकाचे राष्ट्रवादी कार्यालयापुढे आंदोलन; दुसरीकडे पुतण्या शिवसेनेत दाखल


सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे माजी महापौर जेष्ठ नेते मनोहर सपाटे यांनी शहराचे अध्यक्ष महेश गादेकर आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्षाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधले याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती .सपाटे यांनी शहराध्यक्ष गादेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षाची युती व्हावी अशी मागणी केली. प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक सपाटे यांना शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याचे समजतात नाराज झालेले आणि चिडलेल्या सपाटे यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत लक्ष वेधले.मात्र सायंकाळच्या सुमारास त्यांचे पुतणे आणि प्रभाग क्रमांक सात मधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार ज्ञानेश्वर सपाटे यांनी मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपला प्रभाग सपाटे यांना घेऊन मजबूत केल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande