लातूरकरांनो सावधान! वाहतूक नियमांच्या उल्लंघनापोटी १० कोटींचा दणका
लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। लातूर शहराला वाहतूक कोंडीमुक्त आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने २०२५ या वर्षात कारवाईचा धडाका लावला आहे. केवळ दंड वसूल करणे हा उद्देश न ठेवता, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी तब्बल १ ल
लातूरकरांनो सावधान! वाहतूक नियमांच्या उल्लंघनापोटी १० कोटींचा दणका  पोलिसांचा 'फटाका' सायलेंसरवर सर्जिकल स्ट्राईक!


लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। लातूर शहराला वाहतूक कोंडीमुक्त आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने २०२५ या वर्षात कारवाईचा धडाका लावला आहे. केवळ दंड वसूल करणे हा उद्देश न ठेवता, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी तब्बल १ लाख ४ हजार केसेस दाखल केल्या असून, १० कोटी ५७ लाखांहून अधिक दंड आकारला आहे. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही 'क्लीन अप' मोहीम राबवण्यात आली.

​बुलेटच्या 'फटाक्या'वर पंचासमक्ष कारवाई!

​शहरात शांतता भंग करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ३४८ बुलेट सायलेंसरवर पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, जप्तीची प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून पारदर्शकपणे राबवण्यात आली. यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये मोठी जरब बसली आहे.

​कारवाईचा 'रिपोर्ट कार्ड' (२०२५)

​वेगवान वाहने १७,३३६ वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकारणी कारवाई

​अवैध रिक्षा वाहतूक

विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या ११,०२७ रिक्षांना दंड.

​फॅन्सी नंबर प्लेट: 'दादा-भाऊ' लिहिलेल्या ८,२४१ नंबर प्लेट्सवर पोलिसांची नजर.

​न्यायालयीन कडक पावले: दंड न भरणाऱ्या १७५ वाहनधारकांविरुद्ध थेट कोर्टात खटले दाखल.

​'वाहतुकीचे देवदूत' संकल्पना

​केवळ दंडच नाही, तर प्रेमानेही बदल घडवता येतो, हे लातूर पोलिसांनी 'Traffic Ambassadors' या उपक्रमातून दाखवून दिले. पथनाट्य आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनातून शाळा-महाविद्यालयांत वाहतूक साक्षरतेचे धडे देण्यात आले.

​आगामी बदल:

​वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी शहरात १८ सिग्नल सुरू असून आणखी ६ नवीन सिग्नलचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच, पोलिसांच्या मदतीला आता 'ट्रॅफिक वॉर्डन' देखील तैनात केले जाणार आहेत, त्याबाबत महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू

लातूर पोलिसांचा वाहतूक शिस्तीचा 'ग्रँड मास्टर प्लॅन'!

​१ लाख+ केसेस

१०.५७ कोटींचा दंड

३४८ फटाका सायलेंसर जप्त

१७५ जणांवर कोर्टात खटले

​लातूर शहर आता होणार अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध! पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत करा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande