महापालिका निवडणुका महायुतीनेच जिंकणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डोंबिवली, 27 डिसेंबर (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः लक्ष घालत आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर याविषयी बोलली झाली आहेत. कोणी कितीही काहीही आकड्यांचा हिशोब
महापालिका निवडणुका महायुतीनेच जिंकणार  --- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


डोंबिवली, 27 डिसेंबर (हिं.स.)।

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः लक्ष घालत आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर याविषयी बोलली झाली आहेत. कोणी कितीही काहीही आकड्यांचा हिशोब लावून युतीवर कोटी केली तरी कल्याण डोंबिवली महानगर पालिका महायुतीच जिंकेल असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत व्यक्त केला.

डोंबिवलीत पश्चिमेत सम्राट चौकात शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी प्रमुख लता पाटील, माजी महापौर विनिता राणे यांच्यासह माजी नगरसेवक - नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला की, आम्ही कार्यकर्त्यांना एकटे टाकले नाही. आम्ही लोकांच्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिलो आणि दणक्यात नगरपालिका जिंकलो. घरात बसून नुसते तुम लढो हम कपडे सांभालते है असे काम केले नाही. छातीचा कोट करून रस्त्यावर उतरलो. कोविड काळात काय केलं ते जनतेला समजून चुकलं आहे. आता मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात. कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे येथे दुसऱ्या कोणाचे काहीच चालणार नाही. माझ्या बहिणीची ताकद माझ्या मागे आहे तशीच माझे भाऊ ही माझ्या बरोबर आहेत. कारण मी कार्यकर्ता आहे त्यांच्यात जाऊन काम करतो. मला गरिबी काय असते ती मी अनुभवली आहे. मी माझ्या आईचे व पत्नीचे कष्ट पाहिले आहेत म्हणूनच माझ्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि ही योजना कोणाचा माइकलाल आला तरी बंद पडणार नाही. त्यांनी उपस्थितांना युतीलाच निवडून आणा असे आवाहन केले.

तर यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदाकीच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. पूर्वीचे कडोंमपालिकेतील रस्ते आणि आता झालेला बदल हे स्पष्ट चित्र सर्वांसमोर ठेवले. कल्याण डोंबिवलीत आणखी मोठे विकासकामे करण्यासाठी चंग बंदला आहे. शास्त्रीनगर हॉस्पिटलचे रूप पालटून भव्य हॉस्पिटल होणार याची मी खात्री देतो. काही वर्षातच सुतीकागृह आणि कन्सर हॉस्पिटल झालेले दिसेल. पण महापतिलेच्या निवडणुकीत युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नका असा उल्लेख करीत टोला मारला. आम्ही निवडणूक युतीतच लढणार आणि युतीचाच विजय होईल असे ठामपणे सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या तडफदार भाषणाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केले. दरम्यान शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गदा भेट देत भव्य पुष्पहार घालून सत्कार केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande