पुण्यात ‘ठाकरे बंधूं’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। पुण्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. येत्या काही दिवसांवर पुणे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेब
पुण्यात ‘ठाकरे बंधूं’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

पुण्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. येत्या काही दिवसांवर पुणे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार आहे. नुकतीच एक पत्रकार परिषद घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय युतीची घोषणा केली होती. पण कोणाला किती जागा मिळणार याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. अशातच पुणे महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा फॅार्म्युला ठरला आहे.पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण १६५ जागा असून यात ९१ शिवसेना तर ७४ मनसे असा फॅार्म्युला ठरला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे. मात्र, मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे. इतरही महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपासाठी उद्धवसेना आणि मनसेत चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने बैठकांचे सत्र पार पाडले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande