सोलापूर महापालिकेसाठी सहा अर्ज दाखल
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी राहू काळ असल्याने उमेदवाराचा निरुत्साह दिसून आला. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज नेले. आज ६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रभाग द
smc


सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी राहू काळ असल्याने उमेदवाराचा निरुत्साह दिसून आला. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज नेले. आज ६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रभाग दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रुग्णसेवक रूपेशकुमार भोसले यांच्या संपूर्ण पॅनल ने आपले अर्ज भरले. १)प्रभाग १२-ब (पुरुष ) २)प्रभाग १०-अ (महिला) ३)प्रभाग १०-ब (महिला) ४)प्रभाग १०-क (पुरुष) ५)प्रभाग १० (पुरुष) ६)प्रभाग — ११ (पुरुष )एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत.सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी निवडणूक कार्यालयात येऊन सर्व यंत्रणेची पाहणी केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आहेत त्यामुळे येथे उपस्थित सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी कॉफीसाठी इन्व्हाईट केल्याचे दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande