
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील दोन्ही माजी महापौर यु एन बेरिया आणि नलिनी चंदेले या दोन्ही नेत्यांनी राज्याचे कृषिमंत्री कथा किल्ल्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या उपस्थितीत तुतारी फेकून हातात घड्याळ बांधले.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीदरम्यान या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महिन्यापूर्वीच सुधीर खरटमल यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महापालिका निवडणूक रंगात आली असताना या दोन्ही नेत्यांनी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रव ेश करून साहेबांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड