श्री सिद्धेश्वर महायात्रेचा व्यापक कृती आराखडा तयार
सोलापूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। श्री सिद्धेश्वर महायात्रा2026 शांततेत, सुरक्षिततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक पूर्वतयारी व कृती आराखडा मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थ
Siddeswar


सोलापूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। श्री सिद्धेश्वर महायात्रा2026 शांततेत, सुरक्षिततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक पूर्वतयारी व कृती आराखडा मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेतला. तसेच सर्व यंत्रणांना स्पष्ट जबाबदाऱ्याही दिल्या.

मिरवणूक मार्गाची स्वच्छता, मार्गावरील झाडांच्या फांद्या, केबल वायर इत्यादी अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून धूळ प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाणी मारणे, मॅटिंग व रोलिंग करणे, होम मैदानावर वाळू टाकणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्नविषबाधा होऊ नये यासाठी विशेष

सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महावितरण कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत माळपोरे, संदीप कोंडगुळे,आरोग्य अधिकारी राखी माने, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, नियंत्रण अधिकारी एक अतिक्रमण विभाग तपन डंके आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande