सोलापुरात भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ तथा माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली ह
Subhash deshamukha


सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ तथा माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. तसेच, भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली होती. आता, सुभाष देशमुख यांच्या भूमिकेवर जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नेत्याला कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणे साहजिक आहे.

निवडणूक लढवत असताना पक्ष ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते, त्यामागे उभे राहण्याची जबाबदारी असते. नेतृत्वाने त्या भावना व्यक्त केल्या आहेत, कदाचित कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी केलेल्या आहेत. त्यामुळे, सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचे वाटप होईल, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले. सुभाष देशमुख यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे, त्या पक्षात गेलेल्या लोकांची काम करू, अशी वेळ कोणत्याही नेत्यावर येणार नाही, अस जयकुमार गोरे यांनी म्हटले. तसेच, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या नाराजीबद्दलही जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली. दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी जे सांगितले त्यात सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande