
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
शहरातील महाराणा प्रताप
चौक येथून एक महिला गणेश नगर येथे जाण्यासाठी ऑटोमध्ये प्रवास करीत होती. यावेळी संगीता रनेर या महिलेची पर्स ऑटोमध्ये विसरली होती.
ही विसरलेली पर्स ज्यात १६ ग्रामचे गंठण, नगदी पाच हजार ९०० रुपये, एटीएम, आधार कार्ड असे साहित्य होते. ऑटो चालक शेख मोहसीन शेख हुसेन (रा. काद्राबाद प्लॉट) यांनी महिलेचा शोध घेऊन सदरील सर्व वस्तू, पर्स परत दिल्या. ऑटोचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा शहर वाहतूक शाखेने सन्मान केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis