दामाजी कारखाना बंद पाडल्यामुळे ऊसतोड कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान होणार
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। दामाजीची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने स्वतःचे उतारे गहाण ठेवून सभासदांच्या व शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे 3000 चा दर मान्य करत पहिला हप्ता 2800 रुपये खात्यावर जमा करत व
दामाजी कारखाना बंद पाडल्यामुळे ऊसतोड कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान होणार


सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। दामाजीची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने स्वतःचे उतारे गहाण ठेवून सभासदांच्या व शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे 3000 चा दर मान्य करत पहिला हप्ता 2800 रुपये खात्यावर जमा करत व उर्वरित दोनशे रुपयेचे बिल देणार असून यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही तरी सुद्धा शेतकरी संघटनेकडून दामाजी कारखाना बंद पाडल्यामुळे ऊस उत्पादक, वाहतूकदार ऊसतोड कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.पर्यायाने कारखान्याचे गाळप थांबणार असून आर्थिक भार वाढणार असून संस्थेची आर्थिक स्थिती समजून घेऊन आंदोलक शेतकरी संघटनांनी आंदोलन माघारी घ्यावे असे आवाहन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले. तीन वर्षांपूर्वी विद्यमान संचालक मंडळाने कारखान्याचा कारभार हातात घेताना २०० कोटी कर्जात असलेला कारखाना तीन वर्षात चांगल्या पद्धतीने चालवला असून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी बिले अदा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande