नववर्ष गर्दीसाठी रेल्वे सज्ज! पुणे-नागपूरसह ३ मार्गांवर विशेष गाड्या
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। हिवाळा आणि ख्रिसमस, नव वर्षाच्या स्वागतामुळे रेल्वेला मोठी गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेशी समन्वय साधून नागपूर – हडपसर, पुणे – नागपूर आणि राणी कमलापती – हडपसर दरम्यान विशेष शुल्कासह रेल्वे चालवण्याच
Railway


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

हिवाळा आणि ख्रिसमस, नव वर्षाच्या स्वागतामुळे रेल्वेला मोठी गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेशी समन्वय साधून नागपूर – हडपसर, पुणे – नागपूर आणि राणी कमलापती – हडपसर दरम्यान विशेष शुल्कासह रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-हडपसर मार्गावर विशेष रेल्वेच्या चार, राणी कमलापती-हडपसर-राणी कमलापती रेल्वेच्या प्रत्येकी तीन तर पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेच्या प्रत्येकी चार रेल्वे चालविल्या जातील.गाडी क्रमांक ०१२२१ नागपूर – हडपसर विशेष रेल्वे २९, ३१ डिसेंबर आणि २ जानेवारीस नागपूरहून संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा अकराला येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२२२ हडपसर- नागपूर रेल्वे २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारी रोजी हडपसरहून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेसहा वाजता नागपूर येथे पोहोचेल.गाडी क्रमांक ०१४१९ पुणे-नागपूर विशेष रेल्वे २९, ३१ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी पुणे येथून रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२० नागपूर-पुणे विशेष रेल्वे २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारी रोजी नागपूर येथून दुपारी चार वाजून १० मिनिटांनी सुटेल . दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेबारा वाजता पुणे येथे पोहोचेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande