
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)।
पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांत आम आदमी पक्ष (आप) महाविकास आघाडीसमवेत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. पक्ष पुण्यात १०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची पुणे महापालिकेच्या जागावाटपाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यात ‘आप’साठी काही जागा सोडण्याचे सूतोवाच महाविकास आघाडीने केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
घराणेशाही, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदींबाबत त्यांच्या नेत्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणुका न लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाला विलंब झाला आहे. तसेच ‘आप’ने पुण्यात ४१ उमेदवारांची घोषणाही केली आहे. मुंबईत १५, पिंपरी चिंचवडमध्ये १५, कोल्हापूरमध्ये १५ उमेदवारांची घोषणा केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु