
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या तीन तालुक्याच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने रामेश्वर मासाळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले.
गत निवडणुकीत राष्ट्रवादीने नगराध्यक्ष सह काही जागावर यश मिळवले होते.यंदा मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत 20 पैकी चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी दोन जागांवर यश मिळाले. जागा वाटपात भारतीय जनता पार्टीची सरशी झाली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागा असून पंचायत समितीच्या आठ जागा आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड