
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
सचखंड गुरूद्वारा येथे साहिब श्री गुरू गोविंद सिंघजी यांचा प्रकाशपूरब मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी गुरूद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ म्हणाले की, तख्त सचखंड श्री हजूर साहिबचे प्रशासक म्हणून आम्ही येथील शीख समुदायाच्या आणि देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी गंभीरपणे समर्पित आहोत. मुंबई ते नांदेड विमानसेवा सुरू झाली आहे. येथे हे देखील उल्लेखनीय आहे की, सध्या बंगळुरू-आदमपूर (पंजाब), गाझियाबाद, दिल्ली, अहमदाबाद, भाज, पुणे आणि हैदराबाद ते हजूर साहिब पर्यंत हवाई सेवा सुरू आहे, ज्याचा फायदा देश-विदेशात राहणाऱ्या भाविकांना होत आहे.
श्री गुरु गोविंद सिंघजी यांचा प्रकाशपूरबला समर्पित तख्त सचखंड साहिब येथे आयोजित कीर्तन दरबारात भाई सिमरप्रीत सिंघजी हजुरी रागी श्री अमृतसर, माता विपनप्रीत कौरजी, बाबा तेजिंदर सिंघजी जिंदू नानकसर कालेरावाले आणि बाबा कुंदन सिंघजी भलाई ट्रस्टचे कीर्तन जत्थे उपस्थित होते.
ऐतिहासिक परंपरेनुसार, नगर कीर्तन तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथून सुरू झाले आणि शहराच्या विविध भागातून फिरल्यानंतर रात्री तख्त साहिब येथे पोहोचले. या नगर कीर्तनात सोनेरी
आणि चांदीच्या जडवलेल्या खोगीर असलेले गुरु महाराजांचे सुंदर घोडे, कीर्तनी जथा, गटका पार्घा, बँड पार्ष्या, शालेय विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने संगत सहभागी झाली होती. प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ त्यांचे सल्लागार स. जसवंत सिंघ बॉबी, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक, सहायक अधिक्षक, समूह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांच्या प्रकाशपूरबनिमित्त आलेल्या संपूर्ण संगतचे आभार मानले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis