लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले नवीन सहकारी
लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि माजी महापौर चंद्रकांत बिराजदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्या पक्षाला सुगीचे दिवस आल्याचे पहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओढा राष्ट्रवादी पक्ष
पक्षाला सुगीचे दिवस : राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले नवीन सहकारी


लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि माजी महापौर चंद्रकांत बिराजदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्या पक्षाला सुगीचे दिवस आल्याचे पहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओढा राष्ट्रवादी पक्षाकडे वाढला आहे. यामुळे पक्षाला सुगीचे दिवस आल्याचे दिसुन येत आहे.

शिवसेनेचे नेते ॲड. बळवंत जाधव, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख कल्पनाताई बावगे, ॲड. परवेजजी पठाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी काळात देखील अनेकांचे पक्षात प्रवेश होऊ शकतात. यामुळे मनपा निवडणुक चुरशीची होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande